Five Best Marathi Beauty Tips

beauty tips

1) चेहरयावरील सुरकुत्या घालविण्यासाठी

तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याच्या रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहर्‍यावर लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे.
या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.

2) उन्हापासून त्वचा सांभाळा

उष्णतेमुळे ओठ, तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉयश्चरायझिंग क्रीम लावून हळूवार मसाज करावा. सकाळ व संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रित गुलकंद खावा.

3) चेहरा उजळण्यासाठी

एक चमचा टोमॅटोचा गर, चिमूटभर हळद. अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन एकत्र करा. ही पेस्ट चेहर्‍याला लावा. अर्ध्या तासाने कापसाने चेहरा पुसून काढा. त्वचा उजळेल.

4) कोंडा घालविण्यासाठी

केसातील कोंडा फार सतावतो. त्यावर उपचारासाठी आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, संत्र्याचे साल यांचा उपयोग करावा. यापासून घरच्याघरी औषध तयार करता येईल

5) मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी

आठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी. मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.

We are from Ad Film Makers in Mumbai, If you need such services then please let us know.